बॅटरी चोरणारा चोरटा पारोळा पोलिसांच्या ताब्यात

पारोळा पोलिसांच्या

पारोळा (तालुका क्राइम रिपोर्टर समाधान धनगर) : पारोळा पो स्टे गुरनं 205- 2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात एका अज्ञात आरोपीने 60,000/- हजार रुपये किमतीच्या बँटरी या दिनांक 28/07/2025 रोजी रात्री 08:00 वाजेनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने धरणगांव माथा व धान्य मार्केट पारोळा येथुन चोरून नेल्या म्हणून गुन्हा दाखल होता.

सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मा. डॉ.महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, मा. श्रीमती.कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, मा. श्री. विनायक कोते उप विभागीय पोलीस अधिकारी अंमळनेर यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री सचिन सानप यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून त्यांनी पथक तयार करून त्यात तपास अंमलदार पोह/ डाँ शरद पाटील, पोह/ महेश पाटील पोह/ अरुण बागुल, पोकाँ/ सुनील हटकर, पोकाँ/ अनिल राठोड, पोकाँ/ मिथुन पाटील, पोकाँ/ गोविंदा पाटील चापोह/ मधुकर पाटील यांनी सदर चा गुन्हा उघडकीस आणला असून त्यात आरोपी चंद्रकांत गौरख चौधरी रा. आझाद चौक पारोळा याने चोरी केल्याची कबुली दिली असून त्यात आरोपी चंद्रकांत चौधरी हा म्हस्वे फाट्याजवळ सदरच्या बॅटरी लपल्याची माहिती दिली.
सदर गुन्ह्यातील बँट-या त्यांचे ताब्यात असलेले वाहनातच लपविल्यांचे सांगितल्याने सदरचे तपास पथक हे म्हस्वे येथे जाऊन आरोपी चंद्रकांत चौधरी सदर वाहनात चारही बँटरी मिळुन गुन्ह्यातील चोरीस गेला माल 60 हजार रुपये किमतीच्या 04 बँटरीका व गुन्ह्यात वापरलेले वाहन हस्तगत करून सदर आरोपीस २ दिवस पोलीस कोठडी मा. न्यायालयाने दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोह डॉ शरद पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here