पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पिंपरी चिंचवडमधील एका व्यापाऱ्यावर गोळीबार केला. बेकरी चालक भावेश करनानी या हल्ल्यात जखमी झाला आहे.
गोळीबाराचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. पिंपरी पोलिसांकडून तपास सुरू आहे. भावेशला पिंपळे सौदागर मधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला किंवा जुन्या वादातून झाला याचा तपास पिंपरी पोलीस करत आहेत.







