पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : दौंडमधील यवतमध्ये दोन गटात तणाव पहायला मिळाला. व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं तणाव निर्माण झाल्याचे समजते आहे.
संतप्त जमावानं रस्त्यावरील दुचाक्या पेटवल्या. आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे. यवतमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. यवतचा आठवडी बाजार बंद करण्यात आला.







