दंडाची भीती दाखवून ट्रकचालकाला लुटणारा पोलीस कर्मचारी बडतर्फ

महाराष्ट्र पोलिस

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : मोबाईलवर बोलत ट्रक चालवत असल्याचा आरोप करुन १५ हजार रुपये दंडाची भिती दाखवून १० हजार रुपये घेऊन वाटमारी करणार्‍या सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार बापूराव पोपट ढोले याला पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी निलंबित केले आहे. याबाबत ग्रामीण पोलिसांनी पाठविलेल्या अहवालावरुन पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलीस अंमलदार ढोले याने १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खेड शिवापूर बोगदा पास करुन पुढे सातारा बाजूला जाताना कारमधून जाऊन एका ट्रकला अडविले. ट्रकचालक राहुल कुमार शिवनाथ यादव (रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांना “आप फोन पे बात कर रहे है, उसका चलान १५ हजार रुपये है,” असे म्हणून १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यांना स्वत:च्या गाडीत बसवले. त्यांनी माझ्याकडे ऐवढे पेसे नाहीत, बँक खात्यात १० हजार रुपये आहेत, असे सांगितले. तेव्हा तो ट्रकचालकाला खेड शिवापूर येथील एका पेट्रोल पंपावर गेला. तेथील कर्मचार्‍याला ऑनलाइृन पैसे मारण्यास सांगितले. परंतु, या कर्मचार्‍याने रोख पैसे देण्यास नकार दिला.
त्यानंतर तो ट्रकचालकाला एका गॉगल स्टॉलच्या दुकानात घेऊन गेला. तेथील दुकानदाराला ऑनलाईन पैसे देऊन त्याच्याकडून १० हजार रुपये घेतले. ट्रकचालक राहुल यादव यांनी तक्रार केली. त्याची चौकशी करण्यासाठी ढोले याच्याशी संपर्क साधला गेला. त्यावेळी त्याने ट्रकचालकाची माफी मागून १० हजार रुपये ट्रकचालकाला परत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here