रक्षाबंधनाच्या रात्री दारुच्या नशेत तरुणाचा १४ वर्षीय चुलत बहिणीवर अत्याचार

rape
file photo

औरेया (उत्तरप्रदेश) : जिल्ह्याीतील बिधूनामध्ये रक्षाबंधनाच्या रात्री ३३ वर्षीय तरुणाने दारुच्या नशेत १४ वर्षीय चुलत बहिणीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली. रक्षाबंधनाच्या दिवशी तरुणी काकांकडे जाऊन घरी परतली. घरात तरुणी एकटी होती. तिची आई आणि बहीण नोएडा येथे गेल्या होत्या. तरुणीचे वडील घराच्या बाहेर असलेल्या झोपडीत झोपले होते.

तरुणीचा चुलत भाऊ शेतात शौचालयासाठी गेला. त्यानंतर परतताना तरुणीच्या खोलीत घुसला. खोलीत शिरल्यानंतर तरुणीवर अत्याचार करायला सुरुवात केली. तरुणी चुलत भावाचा विरोध करत होती. ती जोरजोरात ओरडू लागली. मात्र, त्याने अत्याचारानंतर रागाच्या भरात बहिणीची गळा दाबून हत्या केली व हळूच घरात जाऊन झोपला
दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी मुलीला आवाज दिला. पण तिने तिच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्यानंतर शेजारांच्या मदतीने दरवाजा उघडला. त्यावेळी मुलगी फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळली. तरुणीच्या खोलीत रक्ताचे डाग होते. त्यामुळे पंचनाम्यासाठी आलेल्या पोलिसांना हत्येचा संशय आला.
पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांची विचारपूस सुरु केली. सूरजीत कुटुंबीयांच्या वतीने पोलिसांना जबाब देऊ लागला. सूरजीत घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण तपासावर लक्ष ठेवत होता. त्यामुळे पोलिसांना सूरजीतवर संशय बळावला. पोलिसांनी पुढील तपासासाठी तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.
तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून कपडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर तरुणीवर अत्याचारानंतर गळा दाबून हत्या झाल्याचे पोस्टमार्टम अहवालात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी सूरजीतच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या चौकशीत सूरजीतने बहिणीची अत्याचार करून हत्या केल्याचे कबूल केले. सूरजीच्या कृत्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here