छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन पोलिस जखमी

पोलिस

बिजापूर (वृत्तसंस्था) : जिल्ह्यात नक्षलवाद्यांबरोबरील चकमकीत मंगळवारी जिल्हा राखीव रक्षक दलाचे (डीआरजी) दोन जवान जखमी झाले, असे अधिकार्‍यांनी सांगितले. या चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी झाले असल्याची शक्यता आहे.

गंगापूर परिसरात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे, सुरक्षा दलाने सोमवारी शोधमोहीम हाती घेतली होती. त्यावेळी नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार केला. यात दोन जवान जखमी झाले. जवानांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.
अधून-मधून दोन्ही बाजूंकडून गोळीबार होत आहे. जखमी जवानांना प्राथमिक उपचारानंतर रायपूर येथे हलवण्यात आले. दोन्ही जवानांची प्रकृती स्थिर आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलमुक्त करु, असा निर्धार केला आहे. या अंतर्गत नक्षलग्रस्त भागात कारवाई केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here