पादचारी महिलांकडील दीड लाखांचे सोन्याचे दागिने दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावले

chain-snatch
संग्रहित छायाचित्र

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : शहरात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला असून, आंबेगाव, कात्रज आणि वारजे माळवाडी परिसरात पादचारी महिलांकडील दीड लाखांचे सोन्याचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात ४२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार या कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक परिसरातील इंद्रायणी इंटरनॅशनल स्कुल समोरून पायी चालत जात होत्या, त्यांच्या गळ्यातील आठ हजरांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक कळमकर अधिक तपास करत आहेत.
कात्रज भागातील वरखेडेनगर परिसरात बुधवारी (१३ ऑगस्ट) सकाळी फिरायला निघालेल्या महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत ५० वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी याप्रकरणाचा तपास करत आहेत.
वारजे परिसरात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर ५५ वर्षीय पादचारी महिलेच्या गळ्यातील ४२ हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावू नेले. ही घटना ७ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रायगोंडा करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here