जळगाव तालुक्यात कुसुंबा येथे चटई कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या
file photo

जळगाव (उपसंपादक नंदुअप्पा पाटील) : तालुक्यातील कुसुंबा येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दि. १८ रोजी संध्याकाळी ५ वाजता उघडकीस आली आहे. या घटनेमुळे कुसुंबा, आमोदे बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

समाधान हिरामण सूर्यवंशी (वय २६, रा. कुसुंबा मूळ आमोदा बुद्रुक ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ असा परिवार आहे. दोन्ही भाऊ हे एमआयडीसी येथील एका चटई कंपनीत काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)सोमवारी दुपारी घरी कोणी नसताना समाधान याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबियांना घटना कळताच त्यांनी समाधान याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. समाधान याने आत्महत्या करण्यामागील कारण समजू शकले नाही. घटनेमुळे कुसुंबासह आमोदे बुद्रुक गावात शोककळा पसरली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here