भडगाव (तालुका क्राइम रिपोर्टर अमीन पिंजारी) : तालुक्यातील कजगाव येथे दिनांक १८ ऑगस्ट रोजी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने एकाच परिसरातील चार घरांमध्ये घरफोडी केली.
घरांचे मालक काही दिवसापासून बाहेरगावी गेले असल्याचा फायदा घेत चोरट्याने चारही घरांचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले व शंकर नगर परीसरा राहत असलेले यशवंत उत्तम मोरे यांच्या घरातून पंधरा ते वीस हजार रुपये लंपास केले , तेथून पुढे चोरट्यांनी त्यांचा मोर्चा अजय सिंग प्रतापसिंग पाटील यांच्या घराकडे वळविला मात्र तेथे काही न मिळाल्याने तिथून पुढे असलेले स्वामी समर्थ मंदिरात जवळ एका बँक कर्मचारी बंद घराचे क्लुप तोडून घरात प्रवेश केला मात्र तेथे ही चोरट्यांच्या हाती काही न लागल्याने तेथूनच पुढे स्टेशन रोड लगत वर्धमान चोरडिया यांच्या घराचे कुलप तोडले असल्याचे समजते,
स्वामी समर्थ मंदिरात जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेज मध्ये पाच चोरटे फिरत असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली असून गावकऱ्यांनी कजगाव पोलीस मदत केंद्र येथे दिवसा व रात्री दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी व रात्री सुरक्षे करता गस्त वाढवण्याचे मागणी केली आहे, सदर घटनेची भडगाव पोलीस स्टेशन येथे माहिती मिळतातच भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा व पोलीस कॉन्स्टेबल दत्तू पाटील, पोलीस हवालदार किशोर सोनवणे, गावाचे पोलीस पाटील राहुल पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन सदर घटनेची सविस्तर पाहणी केली व तपास चक्र फिरवण्यास सुरुवात केली आहे.







