पारोळा (क्राईम रिपोर्टर अरविंद जाधव) । पारोळा येथे दिनांक २६ रोजी पारोळा पोलीस स्टेशन, तहसीलदार नगरपालिका व महावितरण यांच्याकडून शांतता कमिटीची बैठक दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता तहसीलदार कार्यालयात घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील सर्व गावातील पोलीस पाटील, गणेश मित्र मंडळा चे अध्यक्ष व उपाध्यक्ष यावेळी उपस्थित होते. गणेश मंडळाचे विविध समस्या ऐकून त्याचे निवारण करण्यासाठी गावातील तसेच शहरातील खड्डे मुरुमाने भरू, व अतिसंवेदन शील भागात सि.सी.टी. व्ही. कॅमेरे पारोळा नगर पालिकेकडून लावण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान डीजे वाजविण्याची पोलीस स्टेशन कडून परवानगी नाही. असे पी.एस.आय. सानप यांनी सांगितले. मुस्लिम काझी सामसूद्दीन मौलाना यांनी हिंदू मुस्लिम भाई, भाई असे म्हणून मोहम्मद पैगंबर जयंती दि. ५ ला असून गणेश उत्सवामुळे ही जयंती दि. ८ रोजी साजरा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी गणेश उत्सव हा विघ्नहर्ता चा उत्सव असून त्यात कोणीही विघ्न आणू नये. असे अमळनेर उपविभागीय पोलिस अधिक्षक विनायक कोते यांनी म्हटले आहे.
या बैठकीला ला पारोळा तहसीलदार उल्हास देवरे, उपविभागीय पोलिस अधिक्षक विनायक कोते, पोलिस अधिक्षक सचिन सानप, पारोळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, , महावितरण अधिकारी मोरे, व कर्मचारी, गावातील, तसेच तालुक्यातील पोलीस पाटील, विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभासद तसेच पत्रकार हजर होते. गणेश उत्सव व मोहंमद पैगंबर जयंती शांततेत पार पाडावी तसेच पोलिस व प्रशासनास सहकार्य करावे असे उपविभागीय पोलिस अधिक्षक विनायक कोते. यांनी बैठकीत उपस्थितांना सांगितले. यावेळी पत्रकार विश्वास चौधरी यांनी अधिकाऱ्यांच्या त्रुटी सांगितल्या, समाजसेवक पी. जी. पाटील. यांनी सुद्धा रोड वरील पडलेल्या खड्यान बाबत नगरपतिषदेस बजावले असता आम्ही लवकरात लवकर हे खडे माती मुरूम टाकून भरू असे आश्वासन दिले आहे.







