माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना मातृवियोग

डॉ. उल्हास पाटील

जळगाव (प्रतिनिधी) । गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सुभाष पाटील यांच्या मातोश्री श्रीमती गोदावरी आई यांचे आज (दि.३) दुपारी १.३४ ला वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या दुःखद निधनाने गोदावरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गोदावरी आई त्यांच्या शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावासाठी ओळखल्या जात होत्या. त्यांच्या संस्कारांनी आणि मार्गदर्शनाने डॉ. उल्हास पाटील यांना जीवनात प्रेरणा मिळाली. त्यांनी कुटुंब आणि समाजासाठी दिलेल्या योगदानामुळे त्या सदैव स्मरणात राहतील.
दरम्यान, गोदावरी आई यांचे उद्या सकाळपर्यंत अंतिम दर्शनासाठी पार्थिव गोदावरी हॅास्पिटल, भास्कर मार्केट जळगाव येथे राहील. अंतिम संस्कार उद्या सकाळी ११ वाजता डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव येथे होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here