गणेश चतुर्थी प्राणप्रतिष्ठा : LIVE Pooja

गणेश चतुर्थी गणपती प्रतिष्ठापनेसाठी शुभ मुहूर्त

भाद्रपद चतुर्थी प्रारंभ : शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२० रोजी रात्रौ ११ वाजून ०४ मिनिटे
भाद्रपद चतुर्थी समाप्ती : शनिवार, २२ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७ वाजून ५८ मिनिटे
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे शनिवार, २२ ऑगस्ट २०२० रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल.
गणेश प्रतिष्ठापना शुभ मुहूर्त : सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांपासून ते ९ वाजून ३० मिनिटांपर्यंत.
गणेश प्रतिष्ठापना लाभ मुहूर्त : दुपारी २ वाजून १७ मिनिटांपासून ते ३ वाजून ५२ मिनिटांपर्यंत.
गणेश प्रतिष्ठापना अमृत मुहूर्त : दुपारी ३ वाजून ५३ मिनिटांपासून ते सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांपर्यंत.

गणपती प्रतिष्ठापनेसाठी लागणारे साहित्य :

गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्यांचे डहाळे, सुपाऱ्या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्री, ताम्हण, समई, अक्षता, वस्त्र, जानवे, अष्टगंध, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ.

श्री गणपती प्राणप्रतिष्ठा संपूर्ण पूजा LIVE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here