सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) । शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय मंगळवेढा विद्यार्थिनी प्रज्ञा माने (एफ वाय बीएससी) हिने १८ व्या आशियाई ज्युनिअर महिला चॅम्पियनशिप हँडबॉल ताश्कंद उजबेकिस्तान येथे झालेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट हँडबॉल खेळाडू म्हणून बहुमान मिळवला आहे.
तिच्या या यशाबद्दल संस्था परिवार व महाविद्यालय यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी प्रशिक्षक नवनाथ लोहार महा विद्यालयाचे क्रीडा संचालक विशाल होनमाने, आय क्यू एसीसी कॉर्डरनेटर सुधाकर चौगुले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर एस गायकवाड, संस्थेचे संचालक यतीराज वाफळे इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज मंगळवेढाचे प्राचार्य रवींद्र काशीद उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापक यांचे संस्थेचे अध्यक्ष अँड. सुजित बापू कदम उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम संस्थेच्या अँडमिनि स्ट्रेटिव डॉ. मीनाक्षी कदम संस्थेच्या सचिवा डॉ. प्रियदर्शनी कदम- महाडिक संस्थेच्या संचालिका तेजस्विनी कदम यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







