१५ वर्षीय मुलीवर ६५ वर्षीय व्यक्तीचा बलात्कार

बलात्कार
file photo

बिजनौर (वृत्तसंस्था) । चांदपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ वर्षीय मुलीवर ६५ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली असून, आरोपीने पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ६ सप्टेंबरला सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास घरातील सामान खरेदी करण्यासाठी निघाली होती. त्यावेळी ती राहत असलेल्या परिसरातच राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीने तिला घरी बोलावले. आरोपी तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. अब्दुल समद असे आरोपीचे नाव आहे.
पीडितेचा छोटा भाऊ अनस आणि त्याचा मित्र सादान त्याठिकाणावरून जात होते. त्यांनी आरोपी अब्दुल त्याच्या बहिणीवर बलात्कार करत असल्याचे पाहिले. दोघांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये काढला. हा व्हिडीओ त्याने आपल्या वडिलांना दाखवला. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. त्यांनी पीडित मुलीची विचारपूस केली असता तिने संपूर्ण धक्कादायक प्रकार सांगितला.
पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी आमच्या घरी आला आणि त्याने आम्हाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आमचे कुटुंब दहशतीखाली होते. त्यानंतर आम्ही पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here