लघुशंका करण्यापासून रोखल्याच्या कारणावरुन कॅलिफोर्नियात भारतीय तरुणाची निर्दयी हत्या

gun-fire
file photo

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) । अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात एका भारतीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शनिवारी ६ सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षाच्या सुरक्षा कर्मचारी कपिलची हत्या करण्यात आली आहे. कपिलने सार्वजनिक ठिकाणी एका व्यक्तीला लघवी करण्यापासून रोखले. यामुळे त्याला गोळ्या झाडून ठार करण्यात आले. कपिल केवळ आपली ड्यूटी पार पाडत होता, पण याचा मोबदला त्याला आपला जीव गमावून द्यावा लागला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल हा मूळचा हरियाणातील जींद जिल्ह्यातील बराह गावचा रहिवासी होता. तो कॅलिफोर्नियामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. दरम्यान ड्यूटीवर असताना त्याने एका व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी लघवी करण्यापासून रोखले. यामुळे त्या व्यक्तीला राग आला. व्यक्तीने रागाच्या भरातून कपिलची निर्दयी हत्या केली. त्याच्यावर धडाधडा गोळ्या झाडल्या. यामुळे कपिलचा जागीच मृत्यू झाला होता. सध्या या घटनेचा तपास सुरु आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
कपिलच्या मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबीयांना अमेरिकेत राहणाऱ्या एका नातेवाईकाने दिली.कपिलच्या मागे, त्याचे आई-वडिल आणि दोन बहिणी असे कुटुंब आहे. यातील एका बहिणीचे लग्न झाले आहे. बराह गावच्या सरपंचांमी सांगितले की, या परिस्थितीत संपूर्ण गाव कपिलच्या कुटुंबासोबत आहे. सध्या कपिलचा मृतदेग भारतात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी ईश्वर यांचे संपूर्ण कुटुंबा मागणी करणार आहे. सरकारकडून मदतीची आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here