पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उत्साहपूर्ण वातावरणात गणेश विसर्जन

पंढरपूर तालुका

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) । पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावामध्ये गणेश उत्सवाच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या सर्व विसर्जन मिरवणुका पारंपारिक वाद्यांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात गणेश विसर्जन संपन्न झाले.

गणेश उत्सव २०२५ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद ,पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे यांनी वेळोवेळी डीजे डॉल्बी व लेझर शोमुक्त गणेशोत्सव बाबत सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना वेळोवेळी मीटिंगमध्ये दिलेल्या सूचनाप्रमाणे पंढरपूर तालुक्यात पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर व त्यांच्या सहकार्य अधिकारी व पोलीस अंमलदाराने संपूर्ण पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये प्रत्येक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याची भेट घेऊन त्यांना डीजे डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करणे बाबत तसेच पारंपारिक वाद्याचा वापर करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले होते त्या अनुषंगाने सर्व गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी नो डीजे या उपक्रमात उत्स्फूर्तपणे भाग घेऊन सर्वांनी पारंपारिक वाद्याचा वापर केला त्यामध्ये दोन ताशा हलगी व इतर पारंपारिक वाद्य याचा वापर सर्रासपणे मिरवणुकीच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये पहावयास मिळाला त्याबद्दल सर्व नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे पंढरपूर तालुका
गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवलेला होता तसेच विसर्जन घाटावर कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून लाईटीची सोय करण्यात आलेली होती त्याचप्रमाणे लोखंडी बॅरिगेटिंग देखील करण्यात आलेले होते सर्व पारंपारिक वाद्यात गणेश विसर्जन मिरवणुका पार पाडण्याच्या मोहिमे मध्ये सर्व गावचे गणेश मंडळाचे पदाधिकारी सर्व गावचे पोलीस पाटील सर्व गावचे नागरिकांनी सहकार्य केले त्याबद्दल सर्व गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here