पत्रकार घरकुल योजना बाबत प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पुणे विभागीय आयुक्तांच्या भेटीला

पत्रकार घरकुल

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) |पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित घटकासाठी आपल्या लेखणीच्य माध्यमातून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरीखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतः ची पक्की घरे नाहीत

सोलापूर शहर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात रहात असून अल्प मानधन व तुटपुंजा मिळणाऱ्या जाहिरातीमुळे पत्रकारांना स्वतःची मालकी हक्काची घरे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने घेता आली नाहीत कोरोना सारख्या जीवघेण्या काळात पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकार राज्य सरकार चे कोरोना संदर्भात असलेले आदेश निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी पत्रकारांनी पार पाडली आहे स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने जिल्हाधिकारी यांना दिनांक 18/6/2025 रोजी निवेदन सादर केले असून सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतः च्या मालकी हक्काची घरे नसणाऱ्या पत्रकारांसाठी मा.विभागीय आयुक्त साहेबांनी घरकुल योजना संदर्भात योग्य ती कार्यवाही करून पत्रकारांना हक्काचा निवारा मिळवून द्यावा म्हूणन पत्रकार सुरक्षा समिती चे शिष्टमंडळ शुक्रवार दिनांक 12/9/2025 रोजी विभागीय आयुक्त पुणे यांची भेट घेऊन सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्या बाबत निवेदन सादर करणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here