दोंडाईचा पोलीस स्टेशनतर्फे सर्व गणेश भक्तांना आवाहन

दोंडाईचा (संतोष कोळी) – येथे श्रींची स्थापना व विसर्जन करते वेळी कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढू नये.कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवू नये कंटेनमेंट झोन मध्ये सार्वजनिक मंडळांची स्थापना करू नये.आरतीला 4 ते 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन जमू नये व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अनुषंगाने शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना व नियमांचे काटेकोरपणे तंतोतंत पालन करावे. तरी नागरिकांनी व गणेश भक्तांनी पोलीस प्रशासनाला. सुदाम महाजन अप्पर तहसीलदार दोंडाईचा नगरपालिका चे मुख्य अधिकारी प्रवीण निकम.एम एस ई बी भोई साहेब शरद महाजन नगरपालिका दोंडाईचा आरोग्य विभाग इत्यादी प्रशासनाला सहकार्य करावे
यावर्षी चा गणेशोत्सव साध्या पद्धतीने घरीच साजरा करावा. जास्त मोठे मंडप लावू नये रस्त्यावर मंडप लावू नये. दोंडाईचा शहरातील तमाम नागरिकांना व गणेश भक्तांना कळविण्यात येतेकी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस निरीक्षक दोंडाईचा तहसीलदार यांच्या आदेशाने कोरोना महामारी या आजाराचे थैमान जास्त संख्या वाढत असल्याने कोरोनाचे पेशंट यापुढे वाढू नये म्हणून श्री गणेशा स्थापना करून साध्या पद्धतीने चार ते पाच लोकांच्या उपस्थितीत आरती व विसर्जन साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात यावे असे आव्हान धुळे जिल्हा एसपी चिन्मय पंडित यांच्या आदेशान्वये दोंडाईचा शहरातील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक‌ दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पंजाबराव राठोड यांनी कळविले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here