पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ६६२.४५५ किलो गांजा आणि १९.९९७ किलो मॅफेड्रॉन (एमडी) असा एकूण २३ कोटी ३० लाख रुपयांचे अंमली पदार्थ जाळून नष्ट केले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या ९० कारवयांमध्ये हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ नष्ट करण्यासाठी प्रादेशिक अमली पदार्थ नाश समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आहेत तर समितीमध्ये सदस्य म्हणून पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, संदीप आटोळे आणि डॉ. शिवाजी पवार हे आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी वेगवेगळ्या ९० कारवयांमध्ये ३ कोटी ३१ लाख २२ हजार ७५० रुपये किंमतीचा ६६२..४५५ किलो गांजा आणि १९ कोटी ९९ लाख ७० हजार रुपये किमतीचे १९.९९७ मॅफेड्रॉन किलो जप्त केला होता.
अंमली पदार्थ नाश समितीच्या संमतीने हे अंमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. रांजणगाव एमआयडीसी येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड या कंपनीमध्ये हे अंमली पदार्थ सोमवारी (दि.२९ सप्टेंबर) नष्ट करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथक, प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे, राज्य उत्पादन शुल्क पुणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलीस आयुक्त विनमयकुमार चौबे, सहपोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त मुख्यालय श्वेता खेडकर, पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ संदीप आटोळे, पोलीस उपआयुक्त गुन्हे डॉ.शिवाजी पवार, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे १ विशाल हिरे, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे २ प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक शकुर तांबोळी, स्वामीनाथ जाधव, महिला पोलीस हवालदार शिल्पा काबंळे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर मुळे, प्रसाट कलाटे, निखिल शेटे, संतोष स्वामी, पोलीस शिपाई रणधीर माने, कपिलेश इगवे, मितेश यादव, सुभाष गुरव, संतोष सपकाळ, चंद्रकात जाधव, चितांमण सुपे यांनी ही कारवाई केली आहे.








