पारोळा (तालुका क्राइम रिपोर्टर समाधान धनगर) । पारोळा होमगार्ड युनिटतर्फे ७९ वर्धापन दिनानिमित्त शहरातून पथसंचलन काढण्यात आले. भारतात होमगार्डची स्थापना ६ डिसेंबर १९४६ रोजी झाली होती.
वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील एनइएस हायस्कूल मैदानापासून शिवतीर्थ बुद्ध नाथ महाराज पेठ नगरपालिका चौक तलाव गल्ली कजगाव नाका जुन्या महामार्गावरून शेवटी येण्यास हायस्कूल मैदानावर सांगता झाली. यावेळी तालुका समादेशक अरुण पाटील, मायाराम पाटील, छोटू महाजन, प्रभाकर पाटील, निळकंठ आंबोरे, भटू पाटील, अभय पाटील, सुरेश भोई, दीपक पाटील, शिपाई होमगार्ड पुरुष व महिला हजर होते.







