धरणगांव (उपसंपादक प्रा.पी.एम.पाटील) – तालुक्यातील पींप्री ते चिंचपूरा या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून
रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी प्रवाशांच्यावतीने जि.प सदस्य गोपाल बापू चौधरी यांनी केली आहे.
मुसळी फाटा ते धरणगाव या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून असे वाटले होते पावसाळा सुरू होण्याच्या आत काम पूर्णत्वाला येईल परंतु तसे झाले नाही त्यातल्या त्यात पिंप्री अंजनी नदीच्या पुला पासून तर चिंचपूरा पर्यंत येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे जास्त हाल होत आहे एका साईडचा रस्ता खोदून ठेवला असून दुसऱ्या साईडने येणारे व जाणारे हजारो वाहने येताना व जाताना केव्हा काय घटना घडून जाईल हे सांगता येत नाही एकाच वेळेस समोरन येणारे वाहन व जाणारे वाहन ज्यावेळेस समोरा समोर येतात त्यावेळेस फक्त एकच वाहन जाऊ शकेल एवढा रस्ता आहे दुसरे वाहन पास होताना ते पास होईल की नाही अशी भीती वाटते कारण एकाच साईडचा रस्ता एक वाहन जाईल एवढा बरा आहे दुसरे वाहन जाताना त्याला
खड्ड्यातून जावे लागेल वरिष्ठ अधिकारी नेहमी त्या रस्त्याने जात असतात त्यांच्या निर्देशनास ही बाब आलीच असेल तरीसुद्धा हेतू पुरस्कार याकडे दुर्लक्ष केले जात आहे.पूर्णपणे व्यवस्थित काम पूर्ण होई पर्यंत तात्पुरते का असेना मुरूम माती टाकून वाहन सुरक्षित कसे जातील याची तात्काळ व्यवस्था बांधकाम विभागाने करावी अन्यथा काही अपरिचित घटना घडली त्यात एखादा प्रवाश्याचे जीवाचे बरे वाईट झाल्यास यास ठेकेदार व वरिष्ठ अधिकारी हेच जबाबदार राहतील व त्यांच्यावर मनुष्यवदाचा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो याची त्यांनी जाण ठेवून येत्या दोन-तीन दिवसात रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी जि.प सदस्य गोपाल बापू चौधरी यांनी केली आहे.
Home उत्तर महाराष्ट्र धरणगाव धरणगांव तालुका रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्याची जि.प सदस्य गोपाल चौधरी यांची मागणी







