रांधेच्या जयश्री साबळे यांचा आदर्श उपसरपंच पुरस्काराने सन्मानित

जयश्री साबळे

अहिल्यानगर (जिल्हा क्राइम रिपोर्टर दिपक वरखडे) । रांधे सारख्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या २०२१ व २२ या एक वर्षे उपसरपंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत , खऱ्या अर्थाने कामाचा ठसा उमटवणाऱ्या सौ . जयश्री प्रविण साबळे यांना राज्यस्तरीय ” सहयाद्रीरत्न आदर्श उपसरपंच पुरस्कार ” देऊन सन्मान्मित करण्यात आले .

सौ . जयश्री प्रविण साबळे यांनी रांधे सारख्या ग्रामीण भागातील छोट्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच २०२१ व २२ या एका वर्षात काम करत , आपल्या कामाचा ठसा उमटवला , म्हणून त्यांची राज्यस्तरीय दखल घेतली गेली , त्यांच्या सन्मानाचे रांधे नगरी बरोबरच पारनेर तालुक्यातून कौतूक होत आहे
महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व भारत सरकार सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय नोंदणीकृत संस्थेच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेचा ” सह्याद्रीरत्न आदर्श उपसरपंच पुरस्कार ” रांधेच्या २०२१ व २२ या एका वर्षाच्या उपसरपंच पदावर उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या सौ . जयश्री प्रविण साबळे यांना पुणे येथील पत्रकार भवनात राष्ट्रवादी काँग्रेस च्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे डॉ . नितीन धवणे व पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा . संदीप सांगळे यांच्या हस्ते व टॅलेंट कट्टा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ . दिपक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि देऊळ बंद या गाजलेल्या मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आर्या घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदक , सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक सन्मान पूर्वक प्रदान करत गौरविण्यात आले .
हा सन्मान सोहळा राज्यातील कर्तृत्वान व्यक्तींच्या कार्याचा कार्याची दखल घेऊन त्यांचा गुण गौरव करून त्यांच्या कार्याची साता समुद्रापार नेणाऱ्या व त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी , हा उद्देश डोळा समोर ठेऊन राज्यात समाजशिल कार्यासाठी प्रसिद्ध व महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या डॉ . दिपक जाधव यांच्या नेतृत्वाखालील टॅलेंट कट्टा या संस्थेच्या वतीने आयोजन केले जाते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here