निघोजमध्ये भव्य किर्तन महोत्सवाचे १८ डिसेंबरपासून आयोजन

किर्तन

कन्हैय्या परिवाराचे संस्थापक शांताराम लंके यांचे
प्रथम पुण्यस्मरण निमित्त ज्ञानयज्ञ व महाप्रसाद

अहिल्यानगर (जिल्हा क्राइम रिपोर्टर दिपक वरखडे) । पारनेर तालुक्यातील दुध उत्पादकां चे कैवारी म्हणून प्रसिद्ध असलेले , हजारो हातांना रोजगार उपलब्ध करुन देणारे कन्हैय्या परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत शांताराम मामा लंके यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त निघोज गुरुवार दि . १८ ते गुरुवार दि . २५ या कालखंडात तालुक्यात अखंड ज्ञानज्योत तेवत ठेवण्यासाठी राज्यातील नामवंत किर्तनकारांचे ही किर्तनांचा भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कन्हैया परिवाराचे संचालक , महानगर बँकेचे संचालक व प्रसिद्ध उद्योजक बबनराव लंके यांनी दिली आहे .

पारनेर तालुक्यात प्रथम दुध उत्पादकांचे व निघोज परिसरात मामा म्हणून प्रसिद्ध असलेले शांताराम भाऊ लंके हे साधे व सालस व्यक्ती महत्व होय . कोठे ही धार्मिक , आध्यात्मिक , सामाजिक कार्यक्रम असला की , शांताराम मामा लंके हे तेथे तन , मन , धनाने उपस्थित राहत असे . त्यांनी तालुक्यातील अनेक अखंड हरिनाम सप्ताहांना योगदान दिले . सप्ताह म्हटला की , त्यांचा सल्ला व मार्गदर्शन घेतले जात असे . आध्यामिक व धार्मिक क्षेत्रातील दिग्गज विचारवंत किर्तनकार महाराजांशी त्यांचे अत्यंत घनिष्ट संबंध होते .
दिवंगत शांताराम मामांनी स्थापन केलेल्या लंके [ कन्हैया ] परिवाराच्या कन्हैय्या दुध उद्योग , दुध पावडर प्रक्रिया उद्योग ,शुद्ध पाणी उदयोग , पेट्रोल पंप , कन्हैय्या मल्टीस्टेट पतसंस्था या व इतर व्यवसायात निघोज परिसरात हजारो लोकांना पोटासाठी रोजगार देऊन त्यांच्या चुली पेटविल्या . त्याचबरोबर अनेक वर्षांपासून अखंड पणे सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील ज्ञानदान यज्ञात आज अखेर पारनेर , शिरूर , जुन्नर व नगर तालुक्यातील लाखो भाविक भक्तांनी सहभाग घेतला आहे . या सप्ताहात राज्यातील दिग्गज किर्तनकारांनी आपले हरिकिर्तन सादर करत , परिसर मंत्र मुग्ध केला आहे .
दिवंगत शांताराम मामांच्या गत वर्षी डिसेंबर मध्ये अचानक निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला , त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने भव्य किर्तन महोत्सवात दररोज रात्री ६ . ३० ते ८ . ३० वाजता गुरुवार दि . १८ रोजी पहिल्या पुष्पाची किर्तन सेवा मुंबई येथील हभप जगन्नाथ महाराज पाटील , शुक्रवार दि . १९ रोजीचे दुसरे पुष्पातील किर्तन सेवा प्रसिद्ध समाजप्रबोधन ,किर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर , शनिवार दि . २० रोजीचे तिसरे पुष्पातील किर्तनसेवा नाशिक येथील किर्तन महर्षी हभप संजय महाराज धोंडगे , रविवार दि . २१ रोजीचे चौथ्या पुष्पातील किर्तनसेवा श्री क्षेत्र देवीच्या आळंदी येथील संतसेवक हभप ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली , सोमवार दि . २२ रोजीच्या पंचम पुष्पातील किर्तनसेवा केज येथील भावरत्न हभप समाधान महाराज शर्मा , मंगळवार दि . २३ रोजी सहाव्या पुष्पातील किर्तनसेवा जळगाव येथील हिंदू धर्म प्रचारक हभप ज्ञानेश्वर महाराज जवळेकर , बुधवार दि . २४ रोजी सातव्या पुष्पातील किर्तनसेवा जळगाव येथील पिंगळा फेम हभप विशाल महाराज खोले , तर दिवंगत शांताराम मामा लंके यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने गुरुवार दि . २५ रोजी बीड येथील प्रसिद्ध किर्तन केसरी हभप अक्रुर महाराज साखरे यांचे हरिकिर्तन सेवा सकाळी १० ते १२ वाजता आयोजीत करण्यात आले असून तदनंतर महाप्रसाद संपन्न होणार आहे . या किर्तन महोत्सवात गायनाचार्य हभप अभिमान ढाकणे , मयूर म्हस्के , नामदेव तळेकर , गणेश शेंडे , मृदुंगशार्य हभप समाधान कन्हेरकर , मृदुंगसाधक हभप ऋषिकेश सुक्रे व संवादिनी वादक हभप कैलास महाराज सुक्रे व श्री क्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी टाळकरी म्हणून साथ संगत देणार आहेत .
तरी परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपापल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी या ज्ञान यज्ञात सहभागी होत , महाप्रसादाचाही लाभ घेण्याचे आवाहन कन्हैय्या परिवाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र लंके यांनी केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here