धावत्या रेल्वेतून प्रवाशांचे सामानाची चोरी करणारे अट्टल चोरटा यांना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

चोरी

जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) | दिनांक ०८/०२/२०२६ रोजी आनंद मोर्या रा. अयोध्या असे झेलम एक्सप्रेस ने प्रवास करीत असतांना जळगाव ते भुसावळ दरम्यान धावत्या रेल्वेमधुन कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांची बॅग चोरी केली होती सदर बॅगेत १,६५,०००/- रू किं. चे सोने व चांदीचे दागीणे असा ऐवज होता सदर बाबतीत फि।। आनंद मोर्य यांनी इटारसी रेल्वे पोलीसात तक्रार शुन्य नंबर ने दाखल केली असुन सदर तक्रार ही भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशन ला वर्ग करण्यात आला होता

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर चा गुन्हा हा जळगाव येथिल रेकॉर्ड वरील गुन्हेगार १) समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन रा. फातेमा नगर अल्फरा मशीद जवळ जळगाव २) सोनु जयसिंग बागडे रा. जाखनी नगर कंजरवाडा जळगाव यांनी केले असले बाबत खात्रीशीर बातमी श्री. राहुल गायकवाड वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी मिळाल्याने त्यानी त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वर नमुद गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेश दिल्याने त्याप्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय व गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी काढुन फातेमा नगर जळगाव येथुन रेकॉर्डवरील आरोपी नामे समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन वय २१ रा. फातेमा नगर अल्फरा मशीद जवळ जळगांव यांस ताब्यात घेवुन सदर गुन्हया बाबत विचारपुस करता त्यांनी सदर चा गुन्हा हा वर नमुद त्याचे साथीदारा सह केला असल्याचे कबुल केल्यानेत्यास भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशन याचे पथकाच्या पुढील कारवाईकामी ताब्यात दिले आहे. त्याचा दुस-या साथीदाराचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई ही डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक जळगांव, राहुल गायकवाड वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल पोलीस अंमलदार अतुल वंजारी अकरम शेख, विजय पाटील नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रविंद्र कापडणे, यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here