सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) । मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर माचनूर येथे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली.
यावेळी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व सौ. कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी राहुल आत्राम, मंगळवेढा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) बसवराज शिवपुजे तसेच मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे उपस्थित होते.
या प्रसंगी मंदिरात विधीवत पूजा-अर्चा करून राज्याच्या व जिल्ह्याच्या शांतता, सुव्यवस्था आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्यात आली. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. उपस्थित अधिकाऱ्यांनी मंदिर समितीच्या सदस्यांशी संवाद साधत परिसराची पाहणीही केली. या भेटीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून पोलीस प्रशासनाविषयी सकारात्मक भावना व्यक्त होत आहेत.







