पारोळा (तालुका क्राइम रिपोर्टर समाधान धनगर) | मालमत्ता कर पाणीपट्टी वसुलीसाठी पारोळा नगरपरिषदेने अॅक्शन मोडवर येत धडक मोहीम हाती घेतली आहे. थकीत ग्राहक नगरपरिषदेच्या रडारवर आले आहेत. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ७ वसुली पथक नियुक्त करण्यात आलेले आहे.
नगरपरिषदेच्या वतीने शहरातील थकित मालमत्ता कर व नळपट्टी धारकांना बिल व जप्ती पूर्व सूचना व वारंवार तोंडी लेखी सूचना देऊन सुद्धा बरेच मालमत्ता धारक यांनी थकीत रकमेचा भरणा केला नाही. पारोळा नगरपरिषदेची वसुली हि कमी प्रमाणात होत आहे त्यामुळे कर वसुलीसाठी नगरपरिषदेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे नगरपरिषदेने या थकबाकी धारकावर कार्यवाहीच्या बडगा हाती घेतला आहे. त्यामुळे थकबाकी धारकांनी लवकरात लवकर कर भरणा करावा असे आवाहन मा. मुख्याधिकारी यांनी केलेले आहे.
थकबाकीदार नागरिकांनी तातडीने कर भरणा करावा; अन्यथा गाळे सील करणे, मालमत्ता बोजा चढवणे आदी प्रकारची कारवाई केली जाईल.
– तुषार नेरकर,
मुख्याधिकारी, पारोळा.
दि.१२/०३/२०२६ रोजी मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक संजय गिते यांच्या नेतृत्वात विशेष वसुली पथकाने धडक कारवाई करत कुरेशी मोहल्ला, सिद्धार्थ नगर परिसरात १३ नळ कनेक्शन बंद करण्यात आलेले असून हि कारवाई रोज करण्यात येईल. या मोहिमेत अनिल तिदमे (आस्थापना), दिपक महाजन (अंतर्गत लेखापरीक्षक), सार्थक मोरस्कर (अंतर्गत लेखापरीक्षक), संकेत कार्ले (पाणीपुरवठा अभियंता), सुमित पाटील (स्थापत्य अभियंता), विशाल गायकवाड (वसुली लिपिक), विश्वास पाटील, कैलास वानखेडे, शुभम कंखरे, भुषण महाजन, राहुल पाटील व इतर कर्मचारी यांचा देखील सहभाग होता.







