
जळगाव (संपादक सुनिल पाटील) : आजच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे पुस्तके वाचण्याला मर्यादा येत आहेत. परंतु पुस्तके आणि वाचन हीच जीवनाला आकार देणारी महत्त्वाची माध्यमे असल्याने समाजामध्ये ‘बुके ऐवजी बुक’ ही संकल्पना आपण प्रत्येकाने रुजवली व वाढीस लावली पाहिजे अशी अपेक्षा आमदार राजूमामा भोळे यांनी व्यक्त केली.
ग्रामगौरव प्रकाशन व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज गुरुवार, २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिवसाचे निमित्त साधून भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या जीवनगौरव ग्रंथाच्या लेखांचे पृथक्करण करून पुण्यात नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या ‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकाच्या निवडक लेखांच्या अभिवाचनाचा उपक्रम येथील काव्यरत्नावली चौकात आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आ.राजुमामा भोळे हे बोलत होते. यावेळी पुस्तकाचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल,ग्रामगौरवचे संस्थापक विवेक ठाकरे जळगाव जिल्हा बँकेचे एलडीएम सुनील डोहरे,जैन उद्योग समूहाचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी,रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटीचे सचिव अँड.अभय कुलकर्णी,संत गाडगेबाबा युवा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवणे,शितल साळी,रत्नाकर पाटील,डॉ.पूजा वाघ आदी वाचन पिठावर उपस्थित होते.
‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकातील माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्यावरील निसर्गकवी ‘पद्मश्री’ ना.धो.महानोर यांच्या लेखाचे वाचन व्याख्याते प्रा.रामचंद्र पाटील यांनी तर श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या कन्या सौ.ज्योती राठोर यांच्या ‘माझी आई… ताई’ या लेखाचे अभिवाचन प्रसिद्ध निवेदिका अपूर्वा पुष्कराज वाणी यांनी केले.अभिवाचनानिमित्त उपस्थित वाचक व श्रोत्यांना ‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकाचे वितरण करण्यात आल्याने श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या आठवणी जळगावमध्ये पुन्हा ताज्या झाल्या. प्रारंभी कार्यक्रमामागील आयोजनाची भूमिका आपल्या प्रास्ताविकातून संपादक सुरेश उज्जैनवाल यांनी मांडली.
ग्रामगौरवच्या कार्यकारी संपादिका तसेच रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटीच्या अध्यक्षा कु.धनश्री ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले.आभार दिनेश थोरात यांनी मांडले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधुरी थोरात, अरुण इंगळे,गौरव रणदिवे, हर्षल सोनवणे सौ.दीपा बानाईत,सुभाष मराठे, श्रुती मोरे,प्रतीक वरयानी आदींनी परिश्रम घेतले.






