सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज व महात्मा जोतिबा फुले पूर्व-प्राथमिक व प्राथमिक शाळा यांच्या वतीने घेण्यात आलेला विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि चौथी शिष्यवृत्ती शुभचिंतन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी वडूज शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन गोविंद भंडारे, व्हा. चेअरमन विजय म्हामणे, सेक्रेटरी सचिन काळे, स्कूल कमिटी चेअरमन संतोष कांबळे, वडूजच्या नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे यांच्यासह संचालक सतीश शेटे, संजय येवले, विश्वासराव काळे, डॉ. हेमंत पेठे, श्रीकृष्ण पेठे, नितीनकुमार जाधव, ज्ञानेश्वर पंडित, नगरसेवक अभयकुमार देशमुख, माजी चेअरमन सुभाष येवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
सन २०२५-२६ मध्ये शाळेत राबविलेल्या मंथन, अभिरूप, आय एम विनर, अक्षरगंगा, एन. एस. एस. सी. इ. स्पर्धा परीक्षांना इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी बसले होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनातून या सर्व परीक्षामधून भरघोस यश मिळवून विद्यार्थ्यांनी शाळेच्या नाव लौकिकात भर पाडली. या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक वडूज शिक्षण विकास मंडळाने केले. हुतात्मा संकुलाच्या नवोपक्रमातील दर्जेदार वह्यांचे वाटप १०० विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य इ. उपस्थिती होती.







