पारनेर (प्रतिनिधी दिपक भिका वरखडे) । तालुक्यातील सामाजिक , आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेले राजूकाका देशपांडे यांच्या कार्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी कौतुक केले आहे.
निघोज येथील प्रसिद्ध पौराहित्य राजू काका देशपांडे यांनी सध्याच्या समाजातील अत्यंत महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या तरुणांच्या विवाहाचा प्रश्न हाती घेत अनेक विवाह जमवले आहेत . त्याच बरोबर च अनेक तरुणांना व्यसन मुक्तीचा संदेश ही देण्यास ते विसरत नाही . व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाल्याचे ते उदाहरणा सह पटवून देतात . लोकपाल विधेयक , भ्रष्टाचार विरोधी चळवळ , हरित क्रांती या विषयावर देशाला दिशा देणारे अण्णासाहेब हजारे यांनी राजू काका देशपांडे यांचे कौतुक करत , सामाजिक कार्य करत राहण्याचा सल्ला दिला व मार्गदर्शन ही केले .
यावेळी अण्णासाहेब हजारे पुढे म्हणाले की , आजच्या तरुणांनी स्वतः च्या पायावर उभे राहत निव्यर्सनी राहणे , ही काळाची गरज आहे . राजू काका देशपांडे यांच्या प्रमाणे सातत्याने कार्य मग्न राहणे, केव्हा ही चांगले, त्यामुळे व्यसनाना वेळ मिळणार नाही .
सध्या समाजात भेडसावणारा ज्वलंत व जिव्हाळया चा विषय म्हणजे सर्व समाजातील तरुणांचा विवाहाचा भीषण प्रश्न , जणू काही विवाहीतांचे जग तयार होते की , अशी भिती प्रत्येकाच्या मनात निर्माण होत असताना ही काळाची पावलं ओळखून राजू काका देशपांडे तरुणांच्या विवाहाच्या प्रश्नाची जातीने दखल घेतात , त्यांच्या या कार्याची राज्यातील अनेक संस्थांनी दखल घेत , त्यांचा गौरव ही केला आहे.







