पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले ) । राज्यातील धार्मिक पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पंढरपूर शहराच्या विकासासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या शिखर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर देवस्थान विकास आराखडा आणि कॉरिडॉर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.आज झालेल्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
या उच्चस्तरीय बैठकीला उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, वनमंत्री, आमदार समाधान आवताडे यांच्यासह महसूल व जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 1 ऑगस्टपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला वेगाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.आहेत
सुमारे 4000 कोटींचा भव्य विकास आराखडा
पंढरपूरसाठी तयार करण्यात आलेला हा आराखडा तब्बल 4000 कोटी रुपयांचा असून त्यामध्ये:मंदिर परिसरात आधुनिक कॉरिडॉर विकास शहरातील पायाभूत सुविधा सुधारणाभाविकांसाठी सुरक्षित व सुलभ दर्शन व्यवस्थावाहतूक व गर्दी नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना पुढील 50 वर्षांचा विचार करून हा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे.पंढरपूरात येणारी वाढती भाविकांची संख्या – विकासाची गरज लक्षात घेत गैर सोयी टाळण्यासाठी ह्या आराखड्याकडे सर्वांचे लक्ष लागले कारणगेल्या आषाढी एकादशीला सुमारे 28 लाख भाविकांची नोंद झाली होती.
या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराचा विस्तार आणि आधुनिक सुविधा अत्यावश्यक ठरल्या आहेत. ह्या प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात आहे.यामुळे पंढरपूरचा केवळ धार्मिकच नव्हे तर आर्थिक आणि पर्यटन विकास होणार आहे.
व्यापाऱ्यांचा विरोध; सरकार च्यावतीने कॉरिडॉर बाधितांना आश्वासन दिले असले तरीकॉरिडॉर प्रकल्पामुळे काही स्थानिक व्यापाऱ्यांनी स्थलांतराच्या भीतीने विरोध दर्शवला होता.मात्र, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आश्वासन दिले की—“या प्रकल्पामुळे व्यापाऱ्यांचा व्यवसाय दहापट वाढेल.” या मंजुरीनंतर आता लवकरच:भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होईल
प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईलपंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहेपंढरपूरसाठी मंजूर झालेला हा 4000 कोटींचा विकास आराखडा शहराच्या इतिहासातील सर्वात मोठा टप्पा ठरू शकतो. भाविकांना सुलभ दर्शन, सुरक्षितता आणि आधुनिक सुविधा देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.







