शिरपूर पोलिसांच्या कारवाईत १२ लाख रुपयांचा गुटखा जप्त

शहादा (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – दिनांक २३/०८/२०२० रोजी पहाटे गुप्त बातमीदाराकडुन शिरपुर तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि अभिषेक पाटील यांना अशी माहीती मिळाली होती की, इंदौर येथुन धुळयाकडे जाणाऱ्या एका ट्रक मध्ये गुटखा व तंबाखु जन्य प्रदार्थाची चोरुन लपुन वाहतुक केली जात आहे. वरील मिळालेल्या माहीती नुसार सपोनि अभिषेक पाटील यांनी शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे पोसई / दिपक वारे , नरेंद्र खैरनार पोहवा/ लक्ष्मण गवळी , पोशि/योगेश दाभाडे , योगेश मोरे , गोंविद कोळी, यांचे एक पथक तयार करुन हाडाखेड चेक नाका येथे संशयीत वाहनाची तपासणी सुरु केली.
सदर पथकाकडुन वाहन तपासणी सुरु असतांना गुप्त माहीती प्रमाणे ट्रक क्रमांक एम एच १८ बी जी ११०१ ही बारा चाकी ट्रक पथकास मिळुन आली सदर वाहन चालकास वाहनात काय माल आहे याबाबत विचारणा केली असता त्याने चना दाळ व हार्डवेअर साहीत्य ही इंदौर येथुन नेली जात असल्याचे सांगितले सदर वाहनातील मालाबाबत कागदपत्रांची विचारणा केली असता त्याचे कडे कोणतीही संयुक्तीक कागदपत्र मिळुन आले नाही सदर वाहनाची तपासणी सुरु करता मुसळदार व संततदार पाऊसामुळे वाहनातील चना दाळ असलेले साहीत्य खराब होवू नये म्हणून पाऊस थांबताच वाहन तपासणी केली असता हार्डवेअरचे साहीत्य व चना दाळीचे पोत्यांखाली लपवलेल्या अवस्थेत खाली प्रमाणे गुटखा व तंबाखुजन्य माल मिळुन आला.
जप्त केलेला मुद्देमाल रुपये १२,७०,५०० /- किमंतीचा विमल पान मसाला ,व्हि – १ कंपनीचा तंबाखु जन्य गुटखा व प्रतिबंधित सुंगधी सुपारी असे एकुण ५२ पोते २) रुपये २०,००,०००/- रुपये किमतीची बाराचाकी ट्रक क्रमांक एम एच १८ बी जी ११०१ एकुण किमंत रुपये ३२,७०,५००/ असा आहे.
सदर प्रकरणी वाहन चालक शाम मोहनलाल मोर्या रा. कनोद जि. देवास मध्यप्रदेश तसेच बलराम मानसिंग बशानीया रा. रा. कनोद जि. देवास मध्यप्रदेश अशा दोन संशयीतांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली असुन सदर प्रकरणी भादविचे कलम ३२८, २७२,२७३ सह तंबाख ज्पादने प्रतिबंधक अधिनियम कलम ७ नुसार गुन्हा दायल करण्यात आला असुन सदर प्रकरणाचा तपास पोसई वारे करीत आहेत.सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. चिन्मय पंडीत सर , मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. राज भूजबळ साहेब, व अविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल माने साहेब यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाणे पथकाने केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here