फैजपुर (प्रतिनिधी) – येथील साद सलीम तडवी यांची कृती समिती यावलच्या सोशल मीडीया प्रमुखपदी निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष विकास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सर्व फार्मसी कृती समितीचे सदस्य यांनी एकमताने साद तडवी यांची यावल तालुका सोशल मीडीया प्रमुख चे पत्र दिले.फार्मसी कृती समितीवर साद तडवी यांची निवड झाल्याने फैजपूर येथील तडवी फैजपुरकर ग्रुप चे सदस्य संजय तडवी, इरफान तडवी, रशीद बाबू,असलम नजीर, सरफराज तडवी,सलीम तडवी,अलताब तडवी यांनी तडवी यांचे हार्दिक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.







