घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
चोपडा (प्रतिनिधी संदीप ओली) – येथील रेशन विभागात मासिक रेशन 25 ते 30 हजार टन माल शासनाकडून
गोडाऊनला येतो.गोर-गरिबांपर्यंत मात्र पोहोचतांना लाखो रुपयांचा रेशन गायब होतो तर हे लाखो रुपये कोणाच्या खिशात जातात. गरिबांच्या तोंडाचा घास हिसकावणाऱ्या दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रामुख्याने यावेळी करण्यात आली.
१)प्राधान्य कुटुंबाना लाभार्थी म्हणून शिक्का असूनही त्यांना रेशन देण्यात येत नाही त्यांना रेशन देण्यात यावे. २)विभक्त कार्डधारकांना लवकरात लवकर कार्ड देण्यात यावे. ३)लाभार्थी योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थींना शिक्का मारून देण्यात येत नाही.त्याकरीता पैशांची मागणी करण्यात येते. ४)पुरवठाधिकारी कधीच भेटत नाही त्याकरिता गोरगरिबांचे अतोनात हाल होत आहे. ५)60 ते 65 वर्षाचे वृद्ध व्यक्तींचे हाताचे ठसे येत नाही तरी त्यांना मार्च महिन्या पासून धान्य मिळत नाही ते
लवकरात लवकर मिळावे. ६)उडीद मुग पंचनाम्यांबरोबर कापसाचे पंचनामे सुद्धा करावे. भरडधान्य योजनेअंतर्गत शासनाने मका खरेदी केली आहे तरी शेतकऱ्यांना पेमेंट मिळाले नाही.ते पेमेंट शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावे. अशा असंख्य मागण्यांवर तहसीलदार अनिल गावित यांच्याशी चर्चा याप्रसंगी करण्यात आली व तसे निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गंगाधर पाटील,चोपडा पिपल बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी चोपड़ा पिपल्स बँकेचे व्हाईस चेअरमन प्रवीणभाई गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे,माजी जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव,जिल्हा उपाध्यक्ष संजय कानडे,पं. स. सदस्य बापू खैरनार,शेतकी संघ चेअरमन एल.एन.पाटिल,यशवंत पाटील, शहरध्यक्ष शरद देशमुख,नौमान काजी,अकील जहागीरदार,रा.काँ.युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील,रा.काँ.युवक जिल्हा उपाध्यक्ष सनी सचदेव,जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल स्वामी,शहर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पाटील,शहर चिटणीस मोसिन शेख,अनिल वारुळे,प्रमोद पाटील,निलेश राजपूत,लक्ष्मण पाटील,संदिप कोळी,मोहसीन शेख,दुर्गादास पाटील,दीपक पवार,मजहर अली,संकेत जैन,अनुराग पाटील,जितेंद्र विसावे,विनोद पाटील,जयेश सोनवणे,जयेश धनगर यांचा सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.







