पुणे (प्रतिनिधी पंढरी गायकवाड) – महाराष्ट्रात गेल्या दोन-अडीच वर्षे पोलिस भर्ती झाली नाही.आणि 2018 ला पोलिस भर्ती झाली त्यामधील उमेदवार आजूनही प्रतीक्षा यादीमध्ये आहेत तरी उमेदवारांची वयोमर्यादा संपली आहे.उमेदवारांचे पोलिस होण्याचे स्वप्नं हे स्वप्नंच राहणार का? समान गुण असूनही आम्हाला प्रतीक्षा यादीत ठेवले आम्ही 120 मुलं 30 मुली मुंबई,मंत्रालय येथे न्याय मागण्यासाठी गेलो असता आम्हाला मंत्रालयात कोणताही प्रतिसाद मिळाला नाही,आम्हां उमेदवारांची दखल घेतली नाही. त्यावेळी सुप्रिया(ताई)सुळे व सुनील (आण्णा) शेळके यांनी आमची मुंबईतील परस्थिती पाहून आम्हाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
मुंबईतील आमची हालाकीची परिस्थिती पाहून राज ठाकरे ,अमितजी ठाकरे यांनी उमेदवारांना आसरा दिला तरी या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने 2018 च्या पोलिस भर्ती प्रतीक्षा यादीतील मुलांना सेवेत रुजू करून घ्यावे ही विनंती महाराष्ट्र पोलिस भरती प्रतिक्षा यादीतील उमेदवार गौरी वरवे,रमेश शितोळे,राहुल गर्जे, तुषार चैधरी,रवी पदमपल्ले यांनी निवेदनात व प्रत्यक्ष भेटून खासदार सुप्रिया सुळे,व सुनिल आण्णा शेळके यांना या संदर्भात मागणी केली आहे की जर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत रुजू करून घेतले नाही तर त्यांचं भविष्य खराब होईल. २०१८ मधील प्रतीक्षा यादितील उमेदवारांना सवेत सामिल करून घ्यावे त्या उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा . या उमेदवारांनी सुप्रिया ताई सुळे व सुनील आण्णा शेळके यांची भेट घेऊन प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत रुजू करून घेण्याबाबत शासन दरबारी स्पष्ट भूमिका मांडावी असे सांगण्यात आले व सुप्रिया ताई सुळे ,सुनील आण्णा शेळके यांनी तसे आश्वासन सुद्धा दिले आहे.
Home पश्चिम महाराष्ट्र पुणे 2018 महाराष्ट्र पोलिस भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी प्रतीक्षाचं बघायची का..? – ...







