पंढरपूर एमआयडीसीच्या कामाला गती द्या; आमदार लोकनेते समाधानदादा आवताडे यांची मागणी

पंढरपूर

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) । आपल्या पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे नियोजित एमआयडीसीच्या अनुषंगाने आज मुंबई येथील कार्यालयात आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार लोकनेते समाधानदादा आवताडे यांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दीपेंद्रसिंह कुशवाह सो यांची भेट घेतली.

यावेळी नियोजित एमआयडीसीचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आणि पुढील कार्यवाहीबाबतही माहिती घेतली.
कासेगाव येथील एमआयडीसी प्रत्यक्षात साकारल्यास पंढरपूर तालुक्यात नवीन उद्योगांना चालना मिळेल, स्थानिक उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होतील आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. पंढरपूरच्या औद्योगिक विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याने त्याच्या प्रत्येक टप्प्यावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून एमआयडीसीचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे, यासाठी पुढील काळातही आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here