तळोदा (प्रतिनिधी मिलिंद निकम) – तालुक्यातील जनतेने गणपती विसर्जन कुठल्याही नदीपात्रात किंवा घाटावर न करता नगरपालिकेने बनवलेल्या कृत्रिम तलावातच करावे असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक पाकळे यांनी केले आहे. कोरोनासंसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी शासनाला सहकार्य करत गणपती स्थापना केलेले नाहीत. काही गणेश मंडळांनी देखील त्यांना सहकार्य करत गणपती स्थापना न करण्याचा निर्णय घेतला म्हणून कौतुक केले आहे.तसेच घरगुती गणपती स्थापना केलेल्या सर्व नागरिकांनी विसर्जन करताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याने नदीपात्र व घाटावर गर्दी न करता नगरपालिकेने दिलेल्या कृत्रिम तलावातच गणरायाचे विसर्जन करावे असे मत त्यांनी व्यक्त केले.तळोदा नगर परिषदेने शहरात कृषि उत्पन्न बाजार समिती च्या आवारात कृत्रिम तलाव निर्मिती केलेली आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्ण संख्येत वाढ होत असून त्यासाठी सर्वांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तरी जनतेने वाढता संसर्गाचा धोका लक्षात घेऊन मास्क,सॅनीटायझर व सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे असे आवाहन जनतेला केले आहे.
https://www.facebook.com/108973650860466/videos/628233121161873/?t=0







