संयुक्त महाराष्ट्राच्या १०५ हुतात्म्यांना जळगावकरांची भावपूर्ण आदरांजली

संयुक्त महाराष्ट्राच्या

निसर्ग व माणसाच्या समतोलातूनच विकास साधणे हीच खरी हुतात्म्यांना आदरांजली -पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ

जळगाव (संपादक सुनिल पाटील) |  संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या १०५ हुतात्म्यांना जळगाव शहरातील नागरिकांच्या वतीने आज, शनिवारी दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी  भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. शहरातील शिवतीर्थ मैदान (जी. एस. ग्राउंड) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकाळी ९ ते १० या वेळेत हा अभिवादन कार्यक्रम पार पडला.

 

प्रमुख वक्ते पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी आंदोलनाचा दैदिप्यमान इतिहास आणि त्यामागील भूमिका विशद केली. “निसर्ग आणि माणूस यांच्या समतोलावर आधारित महाराष्ट्राचा समन्यायी विकास साधणे, हीच हुतात्म्यांना खरी आदरांजली ठरेल,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी मुंबईतील फ्लोरा फाउंटन (सध्याचे हुतात्मा चौक) येथे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चावर गोळीबार झाला होता. या लढ्यातील १०५ हुतात्म्यांच्या सर्वोच्च त्यागातूनच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, या ऐतिहासिक घटनांनाही गाडगीळ यांनी उजाळा दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास बर्डे यांनी केले, तर सतीश सुर्वे यांनी आभार मानले. याप्रसंगी भालचंद्र सावखेडकर,संग्राम कोळी, संध्या गोयर, पंकज देशमुख, निलेश अजवे, सागर नवले, सुनीता सोनवणे, मयूर राऊत, सुमित सोनार, यशोदीप देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here