नामांकित चित्रपट निर्मात्यास धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – शहरातील मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील नामांकित चित्रपट निर्माता यास आलेल्या धमकीबाबत दिनांक २३/०८/२०२० रोजी रात्री नामांकित मराठी व हिंदी चित्रपट क्षेत्रातील निर्माते, दिग्दर्शक लेखक व कलाकार यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात इसमाने जिव ठार मारण्याचा धमकी देऊन रूपये ३५ करोड इतकी खंडणीची मागणी केली. सदर अज्ञात इसमाने खंडणीची मागणी करताना हवाला मार्फत सदरची रक्कम लवकरात लवकर त्याचे पर्यंत पोहचविण्याचा समज दिली होती. तसेच तो गँगस्टर अबु सालेम उर्फ कॅप्टन याचा हस्तक असल्याचे त्याने त्यात नमुद केले. दि. २३/०८/२०२० ते २५/०८/२०२० रोजीच्या दरम्यान अज्ञात इसमाने वारंवार तक्रारदार यांना धमकीचे संदेश पाठविले तसेच फोन करून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सदर आलल्या धमकीच्या संदेशाच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी दि. २४/०८/२०२० रोजी दादर पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखा, मुंबई येथे तक्रार अर्ज दिला होता.
प्राप्त तक्रार अर्जाच्या अनुषंगाने खंडणी विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई येथील अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय चौकशी सुरू केली. त्याच दरम्यान तक्रारदारांना आलेल्या धमकीच्या अनुषंगाने दि. २६/०८/२०२० रोजी दादर पोलीस ठाणे, मुंबई येथे गु.र.क्र. २४७/२०२० कलम ३८५, ३८७ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई येथे वर्ग करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकामार्फतीने सुरू करण्यात आला आहे.
खंडणी विरोधी पथकाची दोन पोलीस पथके तयार करून तातडीने कल्याण, जि. ठाणे व खेड, जि. रत्नागिरी येथे रवाना करण्यात आली. आरोपी हा गुन्हयासाठी वापरत असलेला मोबाईल सतत बंद ठेवत असल्याने त्याचा शोध घेणे कठिण जात होते. नमुद पथकाने कसोशीने प्रयत्न करून स्थानिक बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषण करून फोन करणाऱ्या इसमाचा शोध घेतला व त्यास खेड, जि. रत्नागिरी येथून ताब्यात घेतले व पुढील तपासकामी खंडणी विरोधी कक्ष कार्यालय, मुंबई येथे घेऊन आले.
तपासकामी आणलेल्या इसमाकडे खंडणी विरोधी कक्षाच्या पोलीस पथकाने कसून चौकशी केली असता त्याने युटयुबवर गँगस्टर अबु सालेमचे वेगवेगळे व्हिडीओ बघून त्याच्याबाबत तसेच त्याच्या गुन्हेगारी कार्यप्रणालीबाबत माहिती प्राप्त केली. त्यानंतर त्याने myneta.com वरून नमुद गुन्हयातील फिर्यादी यांचा मोबाईल नंबर प्राप्त केला व तदनंतर त्यांना गँगस्टर अबु सालेम उर्फ कॅप्टन याचे नावाने हवालामार्फत खंडणीसाठी मेसेज पाठवून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे कबुल केले आहे.
अटक आरोपीताची माहिती :पुरूष आरोपी, वय ३४ वर्षे, रा.ठि. साखरोली, ता. खेड, जि. रत्नागिरी. सदर अटक आरोपीताकडून तपासादरम्यान गुन्हयात वापरलेला मोबाईल फोन व दोन सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. अटक आरोपीतास मा. न्यायालया समोर रिमांडकामी हजर केले असता मा न्यायालयाने त्यांना दिनांक ०२/०९/२०२० रोजी पर्यत पोलीस कोठडी रिमांड मंजर केलेले आहे सदरची कामगिरी सह पोलीस आयुक्त (का. व सु./गुन्हे) श्री. चौबे. गोली उप (एकटीकरण) अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त, डी (विशेष), शशांक आयुव यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील प्र.पो.नि. सावंत, पो.नि. सचिन लील प्र पो.नि. सावंत, पो.नि. सचिन कदम, अरविंद पवार, विश्वास पाटील, सुशिल वंजारी, स.फौ. जाधव, पो.ह. कांबले सो स.पो.नि. राजु सुर्वे, विश्वास पाटील, सुशिल वंजारी, स.फौ. जा पाटील. अनिल रणखाब, साचन दळवी, निलेश कंद, पो.शि. स्वप्नील . .. पो.शि.चा. नवसारे यांनी पार पाडलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here