पुणे (प्रतिनिधी पंढरी गायकवाड) – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगराच्या वतीने धुळे येथे विद्यार्थ्यांना
मारहाण करणाऱ्या राज्य सरकारचा जाहीर निषेध गुडलक चौक, पुणे येथे करण्यात आला.
आज विद्यार्थी विरोधात आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अत्याचार करणारी घटना घडली आहे. धुळे येथे सामान्य विद्यार्थ्यांवर धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली आहे. विद्यार्थ्यांवर अश्या पद्धतीचा हल्ला अभाविप कधीच सहन करणार नाही.व या घटनेस जे कोणी जवाबदार आहेत त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी.
विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे व त्यावर न्याय मागणे हा कोणता गुन्हा आहे ? परीक्षा शुल्क परत मागितले तर विद्यार्थ्यांचे काय चुकले ? विद्यार्थ्यांवर केलेली हि कार्यवाही कितपत योग्य आहे ? असे अनेक प्रश्न यावेळी विद्यार्थी कार्यकर्त्यांनी उपस्थित केले आहेत. हे आंदोलन करत असताना पुणे पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली आहे व सर्वसामान्य कार्यकर्त्यांन वरती गुन्हे दाखल करण्याचे काम पुणे पोलीस करत आहे. य विरोधात आमदार सुनील कांबळे यांनी डेक्कन पोलीस स्टेशन या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत.या सर्व घटनेचा अभाविप पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
Home पश्चिम महाराष्ट्र पुणे विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष मारहाणीचा व मुजोर प्रशासनाचा तीव्र निषेध







