जळगाव जिल्ह्यात आज ५६३ रुग्णांची कोरोनावर मात

आज आढळले ७८० कोरोनाबाधित; जळगाव शहरात सर्वाधिक २१५

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आज (दि.२८) ७८० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात जळगाव शहरात सर्वाधिक २१५ एकाच दिवशी आढळून आले. जळगाव शहरासह चोपडा, चाळीगाव, पारोळा आणि अमळनेरात पुन्हा संसर्ग वाढला असून, तिथे खालोखाल चोपडा-८३, चाळीसगाव-७९, पारोळा -६९ तर अमळनेरात-६२ रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान आज ५६३ पेशंटनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार आज आढळलेल्या ७८० कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर – २१५, जळगाव ग्रामीण – ४२, भुसावळ – २२, अमळनेर – ६२, चोपडा – ८३, पाचोरा – २६, भडगाव – ३३, धरणगाव – ३८, यावल -२१, एरंडोल – ८, जामनेर – ४२, रावेर – २९, पारोळा – ६९, चाळीसगाव – ७९, मुक्ताईनगर – १, बोदवड – ९ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १ असा समावेश आहे.
तालुकानिहाय विचार करता एकूण कोरोनाबाधितांची संख्या जळगाव शहर-५८१२; जळगाव ग्रामीण-१३९२; भुसावळ-१४६७; अमळनेर-२०३१; चोपडा-२१३५; पाचोरा-१०५१; भडगाव-११७५; धरणगाव-१२५२; यावल-८४९; एरंडोल-१५०९; जामनेर-१७७१; रावेर-१२९४; पारोळा-१२४९; चाळीसगाव-१५८७; मुक्ताईनगर-८००; बोदवड-३६५ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १३४ अशी असून, आजच्या तपासणी अहवालानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २५ हजार ८७३ इतकी झालेली आहे. यातील १८ हजार ०८८ रूग्ण बरे झाले आहेत. आज ५६३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आज ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा ७८९ इतका झालेला आहे. सद्यपरिस्थितीत ६ हजार ९९६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here