धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – दैनिक सामनाचे हिंगोली व जळगाव जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील
यांचे औरंगाबाद येथे उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील पिसादेवी रोड पारदेश्वर मंदिरा जवळील स्मशानभूमीत सोमवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांना श्रध्दांजली अर्पण करताना पाणीपुरवठा व स्वछता मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री जळगांव गुलाबराव पाटील म्हणाले की, दैनिक सामनाचे हिंगोली/जळगाव जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील यांचे औरंगाबाद येथे उपचारा दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अखेरचा जय महाराष्ट्र.!
तसेच योगेश पाटील यांना जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, उपजिल्हाध्यक्ष प्रा.पी.एम.पाटील, नगराध्यक्ष धरणगाव निलेश चौधरी तसेच जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी व सर्व पत्रकारांनीदेखील भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.







