४५६ नवीन कोरोनाबाधित; सर्वाधिक १२९ जळगाव शहरात
जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आज (दि.३१) जिल्ह्यात ४५६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यातील सर्वाधिक जळगाव शहरात १२९कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यासह भुसावळ , भडगाव, जामनेर आणि पारोळा पुन्हा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान ५२३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार जिल्ह्यात ४५६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहरातील १२९ कोरोनाबाधितांखालोखाल भुसावळ – ५६, भडगाव-४७, जामनेर-३१, पारोळा-३१ रूग्ण आढळून आले आहेत.
आज आढळलेल्या ४५६ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर-१२९, जळगाव ग्रामीण-६, भुसावळ-५६, अमळनेर-३६, चोपडा-३०, पाचोरा-३, भडगाव-४७, धरणगाव-२, यावल-१०, एरंडोल-१९, जामनेर-३१, रावेर-२२, पारोळा-३१, चाळीसगाव-२८, बोदवड-२ व दुसर्या जिल्ह्यांमधील ४ असा समावेश आहे.
आजच्या अहवालानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २७ हजार ५९१ इतकी झालेली आहे. यातील १९ हजार ७३६ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून, आज ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ८१३ इतका झालेला आहे. सद्यपरिस्थितीत ७ हजार ४२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.







