बीजिंग : लडाखमध्ये झालेल्या हिंसेत 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे. याचा मोठा फटाका चिनी मोबाईल उत्पादक कंपनी ओपोला बसण्याची शक्यता असल्याने कंपनीने फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या भारतातील लाँचिंगसाठी आयोजित केलेला लाइव्ह इव्हेंट रद्द केला आहे.
Oppo Find X2 स्मार्टफोन गुरुवारी संध्याकाळी लाँच केला जाणार होता. कंपनीकडून हा डिव्हाइस संध्याकाळी 4 वाजता एका ऑनलाइन ओन्ली इव्हेंटमध्ये लाँच केला जाणार होता. या कार्यक्रमाची लाइव्ह स्ट्रीमिंग YouTube वर होणार होती. पण, ही YouTube लिंक नंतर गायब झाली आणि लाइव्ह लाँचिंग रद्द झालं. लाइव्ह लाँचिंगऐवजी कंपनीने 20 मिनिटांचा एक प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ शेअर करुन फोन भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध झाल्याची घोषणा केली आहे.






