नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – कोरोना पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचे औचित्य साधून रोटरी क्लब नंदुरबारतर्फे
शहरातील शहीद शिरिषकुमार मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मास्क व सॅनेटाईझरचे वाटप करण्यात आले. बालवीर चौक परिसरात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी रोटरी क्लबचे नवनियुक्त अध्यक्ष पंकज पाठक, सचिव वास्तुविशारद निरज देशपांडे, माजी अध्यक्ष हिरालाल महाजन, सदस्य नरेंद्र जाधव यांच्या हस्ते मास्क व सॅनेटाईझरचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांचे पंकज पाठक यांनी कौतुक केले. शासन नियमांचे पालन करीत कोरोना योद्धा म्हणून प्रत्येक नागरिकाने लढा देत कोरोनाला हरवायचे आहे. असे आवाहन रोटरी क्लब तर्फे करण्यात आले. याप्रसंगी शहीद शिरिषकुमार मित्र मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार सेवानिवृत्त शिक्षक जी. एस. गवळी, संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, सदस्य डॉ. गणेश ढोले, संभाजी हिरणवाळे, संजय चौधरी, सदाशिव गवळी, गोपाल हिरणवाळे, साहुल कुशवाह, विशाल हिरणवाळे, मोतीलाल नुकते, कृष्णा चौधरी, धिरेन हिरणवाळे, आकाश हिरणवाळे, तेजस ढोले आदी सदस्य उपस्थित होते.








