जळगाव – शहरातील सर्वात वर्दळीचा भाग असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीसमोर असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी उद्याना कंपाऊंड वॉलला लागून असलेल्या एका दुकानाच्या ओट्यावर आज (दि.१९) सकाळी अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. शरीरावरील जखमांवरून त्याचा खून झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आज सकाळी येथून जाणाऱ्या काही नागरिकांना हा मृतदेह दिसल्याने त्यांनी शहर पोलिस स्टेशनला कळविले. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.






