नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी च्या परीक्षेसाठी नागपूर येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाड-अलिबाग आगाराकडून बस व्यवस्था

अलिबाग सोगांवकर- नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी ची परीक्षा रविवार, दिनांक 6 सप्टेंबर 2020 रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांना राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागातील महाड-अलिबाग आगाराकडून दिनांक 5 सप्टेंबर 2020 रोजी प्रवासी मागणीनुसार बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तरी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमीच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांनी आगार व्यवस्थापक, महाड-अलिबाग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य परिवहन, रायगड विभाग, पेणच्या विभाग नियंत्रक श्रीमती अनघा बारटक्के यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here