फैजपूर (प्रतिनिधी डॉ. मोहन साळुंके) – फैजपुर पोलीस स्टेशन जिल्हा जळगाव यांनी गणेश उत्सव दरम्यान अवैध
धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यात संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली मोठी मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत दारुबंदी कायद्या अंतर्गत विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली.
या कारवाईत फैजपुर पोलीस स्टेशन प्रोव्हीबिशन गुरन 33/2020 मुं.दा.का.कलम 65 (ई),(फ),(ब) प्रमाणेचे गुन्हयात आरोपी नामे रविंद्र भास्कर कोळी उर्फ चिनी महाराज रा. पाडळसा ता.यावल हा गावठी हातभट्टीचे दारुची भट्टी लावुन मिळुन आला त्याचे कब्जात एकुण18,500/- रुपये किंमतीची अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारु पाडण्याचे गुळ मोहमिश्रीत कच्चे व पक्के रसायन व तयार गाहभची दारु असा मुद्देमाल मिळुन आला आहे. (2) फैजपुर पोलीस स्टेशन प्रोव्हीबिशन गुरन 34/2020 मुं.दा.का.कलम 65 (ई),(फ),(ब) प्रमाणेचे गुन्हयात आरोपी नामे अशोक पुंडलीक कोळी. रा. पाडळसा ता.यावल हा गावठी हातभट्टीचे दारुची भट्टी लावून मिळुन
आला त्याचे कब्जात एकुण 10,500/- रुपये किंमतीची अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारु पाडण्याचे गुळ मोह मिश्रीत कच्चे व पक्के रसायन व तयार दारु असा मुद्देमाल मिळुन आला आहे. (3) फैजपुर पोलीस स्टेशन प्रोव्हीबिशन गुरन 35/2020 मुं.दा.का.कलम 65 (ई),(फ),(ब) प्रमाणेचे गुन्हयात आरोपी जगन कौतीक तायडे रा. कासवा ता.यावल हा गावठी हातभट्टीचे दारुची भट्टी लावुन मिळुन आला त्याचे कब्जात एकुण 16,500/- रुपये किंमतीची अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारु पाडण्याचे गुळ मोह मिश्रीत कच्चे व पक्के रसायन व तयार दारु असा मुद्देमाल मिळुन आला आहे. (4) फैजपुर पोलीस स्टेशन प्रोव्हीबिशन गुरन 36/2020 मुं.दा.का.कलम 65 (ई),(फ),(ब) प्रमाणेचे गुन्हयात आरोपी नामे सोपान सुरेश सपकाळे रा. कासवा ता.यावल हा गावठी हातभट्टीचे दारुची
भट्टी लावुन मिळुन आला त्याचे कब्जात एकुण 9,000/- रुपये किंमतीची अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारु पाडण्याचे गुळ मोह मिश्रीत कच्चे व पक्के रसायन व तयार दारु असा मुद्देमाल मिळुन आला आहे.
तसेच महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत फैजपुर पोलीस स्टेशन भाग 06 गुरन 34/2020 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) सह भादवी कलम 188, 270 प्रमाणे न्हावी ता.यावल गावी केलेल्या कार्यवाहीत आरोपी नामे (i) लोकेश यशवंत वारके, (ii) गिरिष शंकर लढे, (iii) हितेश यशवंत चोपडे, (iv) अजित मुरलीधर चोपडे, (5), उल्लास विलास चोपडे, (v) प्रितेश नरेंद्र (vi) प्रवीण काशीराम इंगळे, (vii) चेतन ललीत झोपे सर्व रा. न्हावी ता.यावल हे झन्ना मन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळ खेळताना व खेळवितांना मिळुन आल्याने त्यांचे कब्जात 8675/- रुपये रोख व एक 52 पत्याचा कॅट मिळुन आले आहे., दुसऱ्या कारवाईत फैजपर पोलीस स्टेशन भाग 06 गुरन 35/2020 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) सह भादवी कलम ___188, 270 प्रमाणे पाडळसा ता.यावल गावी केलेल्या कार्यवाहीत आरोपी नामे (i) हिरानंद देवचंद भोई, (ii) संजय मधुकर सोनवणे, (iii) सोपान पितांबर कोळी, (iv)
संजय लालचंद भोई, (5) सैय्यद इमरान सैय्यद युसुफ सर्व रा. पाडळसा ता.यावल हे झन्ना मन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळ खेळताना व खेळवितांना मिळुन आल्याने त्यांचे कब्जात 2190/रुपये रोख व एक 52 पत्याचा कॅट मिळुन आले आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे फैजपुर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली फैजपुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश वानखडे, पोलीस उपनिरिक्षिक रोहिदास ठोबंरे सहाय्यक फौजदार/912 हेमंत सांगळे, पोलीस हवालदार/1239 उमेश पाटील, पोलीस हवालदार/2568 देविदास सुरदास, पोलीस नाईक/930 किरण चाटे, पोलीस नाईक/2012 महेश वंजारी, पोलीस नाईक/2965 अनिल महाजन, पोलीस नाईक/2481 उमेश सानप पोकॉ/252 चेतन महाजन यांनी पार पाडली आहे. यापुढे देखील अवैध धंदयावर अंकुश ठेवण्यासाठी अशाच प्रकाराचे मोहिमा वेळोवेळी राबविण्यात येतील, असेही फैजपूर पोलिसांतर्फे सांगण्यात आले.







