अनंतशांती व फिरंगोजी शिंदे संस्थेच्यावतीने करवीर तालुक्यात इम्युनीटी बुस्टरचे वाटप

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी अनिल पाटील) – अनंत शांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर व कसबा वाळवे आणि क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे सामाजिक संस्था गिरगाव या दोन्ही संस्थे मार्फत ग्रामीण भागातील गरजू लोकांचा कोरोना पासून बचाव व्हावा या साठी श्री काडसिद्धेश्वर महाराज सिद्धगिरी मठ यांच्या सहकार्याने युनिटी बूस्टर होमिओपॅथी औषध चे वाटप करवीर तालुक्यातील खुपिरे येथे करण्यात आले.
कोरणा प्रतिबंधक इम्युनीटी बुस्टर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने दोन्ही संस्था प्रयत्न करीत आहेत.
वस्ताद प्रमोद पाटिल यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करुन पुष्पहार घालण्यात आला.
हे औषध वाटप करताना योग्य ती खबरदारी घेऊन वाटप करणार असल्याचे अनंत शांती संस्थेचे अध्यक्ष भगवान गुरव सर यांनी सांगितले.
या औषधाचा संस्थेमार्फत कमीत कमी 50 हजार लोकांना लाभ मिळावा असा संस्थेचा उद्देश आहे. यापूर्वी कसबा वाळवे,पालाकरवाडी,आनूर,यळगूड,वसगड़े या ठिकाणी औषधांचे वितरण करण्यात आले. सामाजीक कार्यकर्ते आपासो रेवडे ,सागर पाटिल यांच्यासह तलाव तालिमच्या कार्यकर्त्यानी योग्य नियोजन करून अतिशय शांततेत व नियोजनबद्ध कार्यक्रम पार पाडला. 1490 ग्रामस्थानी याचा लाभ घेतला.
या कार्यक्रमास फिरंगोजी शिंदे संस्थेचे अध्यक्ष वस्ताद प्रमोद पाटील यांनी कोरोणाविषयी जनजागृती करीत मार्गदर्शन केले. यावेळी नारायण पाटिल,सचिन पाटिल,संभाजी पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here