पिंपळनेरचा वीज वितरण सहाय्यक अभियंता संजय माळी याला लाच घेताना अटक

शहादा (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – पिंपळनेर वीज वितरणाचे सहाय्यक अभियंता संजय कौतिक माळी याला घरगुती वापरासाठी नवीन मिटर देण्यासाठी चार हजाराची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्या विरुध्द पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळनेर शहरातील सटाणा रोड या भागातील एका ४३ वर्षीय व्यक्तीस नवीन घरगुती वापरासाठी नविन मीटर घेणे असल्याने त्यांना नवीन मिटर मिळून देण्यासाठी तक्रारदार यांच्या कडून आज वीज मीटर देण्याच्या मोबदल्यात ४ हजार रुपयांची सहाय्यक अभियंता संजय कौतिक माळी यांनी पंच साक्षीदार समक्ष केली. त्या अनुषंगाने सापळा रचून कारवाई केली असता,आरोपी सहाय्यक अभियंता संजय कौतिक माळी यांनी तक्रारदार यांचे कडून आज रोजी पंचांसमक्ष ४ हजार रुपये रक्कम स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी स्वीकारली. त्यामुळे पंच साक्षीदार समक्ष आरोपी लोकसेवक यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेवून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला. त्यावेळी संजय माळी हा चार हजाराची लाच घेतांना आढळून आला.त्याला पथकाने अटक केली आहे. सदर कारवाई सुनील कडासने पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक, निलेश सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.धुळे, सहा. सापळा अधिकारी मंजीतसिंग चव्हाण पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.धुळे, पर्यवेक्षण अधिकारी.. सुनील कुराडे पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि. धुळे, संदीप सरग, सुधीर सोनवणे, प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडिले, भूषण थेटे यांच्या पथकाने केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here