यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव

शिवशंभु प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

यावल (सुरेश पाटील) – कोविड-१९ आपत्ती मध्ये यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी देशासाठी,समाजासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपल्या नागरिकांच्या आरोग्य हितासाठी आणि सुरक्षे साठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल कोरोना योद्धा म्हणून शिवशंभु प्रतिष्ठान यावल तालुका अध्यक्ष कुमारी कविता ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते “कोरोना योद्धा” म्हणुन सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला
यावेळी शिवशंभु प्रतिष्ठान च्या तालुका अध्यक्ष कविता पाटील,चंद्ररेखा मिस्तरी,मयूर पाटील, कोमल पाटील, योगेश पाटील, राहुल कोळी, अल्पेश जैन, जगदीश गायकवाड, इत्यादी शिवशंभु प्रतिष्ठान चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here